‘तू माझी ब्युटीक्वीन’ लावणार प्रेक्षकांना वेड

19

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवेकोरे गाणे घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. ‘तू माझी ब्युटीक्वीन’च्या रेकॉर्डिंगला नुकतीच पुण्यातील व्हीएसएच स्टुडिओ येथे सुरुवात झाली. या गाण्यातून अभिनेता किशोर बोरकर झळकणार आहे. ‘तू माझी ब्युटीक्वीन’ हे नॉन फिल्मी गाणे सर्वांना थिरकायला भाग पाडेल यात जराही शंका नाही. या गाण्यामधून नवीन आणि आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. हे गाणे म्हणजे रसिकांसाठी सरप्राइज असेल. या गाण्याचे गीतकार राहुल सूर्यवंशी असून विनय देशपांडे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या