सलमानच्या ट्युबलाईटचा क्लायमॅक्स फुटला?

26

सामना ऑनलाईन । मुंबई

अवघ्या मनोरंजन विश्वाला बांडगुळासारख्या पसरलेल्या पायरसी नामक किडीचा फटका सलमानच्या ट्युबलाईट या चित्रपटाला बसण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, या चित्रपटाचा क्लायमॅक्सचा प्रसंग जाहीर झाला आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांना पायरसीचा फटका पडला आहे. अगदी बाहुबलीसुद्धा पायरसीपासून वाचला नाही. आता बाहुबलीपेक्षाही हिट असा दावा केला गेलेला ट्युबलाईटही या शेवटच्या प्रसंगामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

सलमान खान या चित्रपटात लक्ष्मण सिंह नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेला ट्युबलाईट असं टोपणनाव आहे. या ट्युबलाईटच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचं चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आलं आहे. या ट्युबलाईटच्या आयुष्यात एका कॅमिओ डान्सरचा प्रवेश होतो. या डान्सरच्या व्यक्तिरेखेतला शाहरुख खान असलेला चित्रपटातला भागच नेमका फुटला आहे. मनोरंजन विश्वात शक्यतो चित्रपट फुटणार नाही याची काळजी घेतली जाते. पण, आता या घटनेमुळे पुन्हा पायरसीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या