तुकाराम मुंढे यांना महिला आयोगाची नोटीस

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एका महिला अधिकाऱयाच्या तक्रारीवरून राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली असून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मुंढे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

नागपूर महापालिकेतील एक महिला अधिकारी भानुप्रिया यांनी मुंढेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यात, मुंढे यांनी भानुप्रिया यांना बाळंतपणातील राजेंचे लाभ नाकारून त्यांचा मानसिक छळ मुंढे यांनी केला आहे. मुंढे यांनी आपल्याला करणे दाखवा नोटीस बजावल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत महिला आयोगाने मुंढे यांना सादर प्रकरणावरील अहवाल 7 दिवसात सादर करण्यास सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या