तुकाराम मुंढेंनी नागपूर महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

963

ध्येयवेडे व धडाडीने काम करणारे आयुक्त अशी राज्यभर ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांनी आज महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच, नियमाने कामे करण्याचे निर्देश देत त्यांनी एकप्रकारे अधिकाऱ्यांना तंबीच दिली. एवढेच नव्हे निटनेटकेपणाने वागण्याचा सल्लाही दिला.

गेल्या सहा दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यभार स्वीकारण्याबाबत रहस्य होते. त्यांची बदली रद्द झाल्याचीही अफवा उडाली होती. मात्र, मंगळवारी सकाळी 9 वाजताच त्यांनी महापालिका गाठली. साडेनऊ वाजता त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी लगेच विभागप्रमुखांची बैठक घेतली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कामे करावीत. आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ओळखून कामे करावीत, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. ते येणार असल्याची मोजक्‍याच अधिकाऱ्यांना माहिती होती. त्यामुळे अनेकजण दहानंतर कार्यालयात पोहोचले. आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्याचे समजताच अनेकजण धावत पळत महापालिकेत आले. विभागप्रमुखांच्या बैठकीनंतर त्यांनी आज महामेट्रोच्या लोकार्पण समारंभात हजेरी लावली. लोकार्पणानंतर ते पुन्हा महापालिकेत आले. दिवसभर सर्व विभागाच्या विभागप्रमुखासमवेत त्यांनी बैठक घेतली. बैठकांचे सत्र दिवसभर सुरू होते. सर्व विभागप्रमुखांनी संबंधित विभागाची माहिती आणि कामांचा गोषवारा तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या