शहबाज शरीफ यांनी विचारले ‘मी येऊ?’ तुर्कस्तान म्हणाला ‘अजिबात येऊ नका’, पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय बेईज्जती

तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपामुळे आपल्याला फार दु:ख झाले आहे आणि आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते आहे हे दाखवण्याच्या नादात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्यासह उभ्या पाकिस्तानची बेईज्जती करून घेतली आहे. इजिप्त आणि तुर्कस्तानमध्ये आलेल्या महाभयंकर भूकंपानंतर हाहाकार माजला आहे. तिथल्या मृतांचा आकडा हा 11 हजारच्या वर गेला आहे. हिंदुस्थानने मागचा पुढचा विचार न करता तातडीने बचाव पथके तुर्कस्तानला रवाना केली आहेत. कंगाल असलेला पाकिस्तान आपण काय मदत करायची या विचारात होता, ज्यामुळे शहबाज शरीफ यांनी आपणच तुर्कस्तानला जाऊया असा निर्णय घेतला होता. या संकटसमयी सगळी ताकद मदत आणि पुनर्सवसनासाठी वापरली जात असताना आपल्या दौऱ्यासाठी तुर्कस्तान आपली संसाधने व्हीआयपींसाठी देऊ शकणार नाही याचा शहबाज शरीफ यांनी साधा विचारही केला नाही. मी येतो असं शहबाज यांनी तुर्कस्तानला सांगितल्यानंतर तुर्कस्तानने त्यांना येऊ नका असा निरोप पाठवला आहे.

कंगाल पाकिस्तानने तुर्कस्तानसाठी 51 सदस्यांचे एक बचाव पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मदत निधी उभारण्याचे कामही पाकिस्तानने सुरू केले आहे. मात्र जिथे खाण्या-पिण्याचे वांदे आहेत तिथे लोकं तुर्कस्तानला काय मदत करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

तिसऱ्या दिवशीही तुर्कस्तान, सीरियात शोधमोहीम सुरूच

तुर्कस्तान आणि सिरियाला बसलेल्या जबरदस्त भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या 11 हजारांपेक्षा जास्त इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या नागरिकांसाठी बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा 11 हजार 719 कर पोहोचला आहे तर जखमींची संख्या 37 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत आपत्कालीन पथक आणि लष्कराने राबवलेल्या मोहिमेत 8 हजार लोकांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, तुर्कस्तानामधील 10 शहरांमधील हजारो इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा 10 हजारांच्या पुढे जाईल, अशी भीती युनाईटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने तर मृतांचा आकडा 20 हजारांच्या पुढे जाईल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

मध्य पूर्वेतील तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलला सोमवारी पहाटे 4 वाजता भूकंपाने धक्के बसले.  तुर्कस्तानच्या वेळेनुसार पहिला, सकाळी 4 च्या सुमाराला (7.8) आणि दुसरा सुमारे 10 (7.6) आणि तिसरा दुपारी 3 वाजता (6.0) असे भूकंपाचे तीन मोठे धक्के बसले. याशिवाय 78 आफ्टरशॉकची नोंद झाली आहे. त्याची तीव्रता 4 ते 5 इतकी मोठी होती.

3 महिन्यांसाठी आणीबाणी

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे चार वाजता झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या काढत असून अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत. त्या पार्श्वभूमीवर, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्देगान यांनी 10 राज्यांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे. या भागांना भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

70 देशांतून मदतीचा ओघ सुरू 

तुर्कस्तान आणि सिरियासाठी जगभरातील 70 देशांनी पुढाकार घेत मदत आणि बचावकार्यासाठी पथके पाठवली आहेत. हिंदुस्थाननेही तुर्कस्तानला मदत पाठवली आहे. यात 100 कर्मचारी असलेल्या एनडीआरएफच्या 2 टीम, विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात पोहोचली आहेत.

 तुर्कस्तानच्या भौगोलिक रचनेत बदल 

भूकंपामुळे ऍनाटोलियन टेक्टोनिक प्लेट आणि अरेबियन प्लेट एकमेकांपासून 225 किलोमीटर दूर सरकल्या आहेत. त्यामुळे तुर्कस्तान आपल्या भौगोलिक ठिकाणापासून 10 फूट सरकले आहे.

Turkey insults Pakistan, refuses to host Pakistani prime minister Shehbaz Sharif