कोळथरे येथे कासव संरक्षण केंद्राने समुद्रात पिल्ले सोडली

61

सामना ऑनलाईन । दापोली

दापोली तालुक्यातील कोळथरे समुद्रकिना-यावर असलेल्या कासव संरक्षण केंद्रातील ८४ कासवांची पिल्ले मंगळवारी समुद्रात विसावली.

नोव्हेंबर महिन्यापासून समुद्र किना-यावर कासवांनी घातलेली अंडी शोधून सुरक्षित ठेवण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कोळथरे समुद्रकिनारी सापडलेल्या कासवांच्या अंड्यातून बाहेर आलेल्या ८४  पिल्लांना आगोमचे संचालक दिपक महाजन आणि कासवमित्र केदार तोडणकर यांनी समुद्रात सोडले.

पाच वर्षांपूर्वी वन विभागाने कासव संवर्धनाचे काम हाती घेतले. त्यानंतर दापोली तालुक्यातील केळशी, पाडले, मुरूड, कर्दे आणि कोळथरे या ठिकाणी कासवसंवर्धन केंद्र सुरू झाली. ऑलिव्ह रेडली जातीच्या कासवांच्या अंड्यांची होणारी तस्करी आणि कोल्हे, भटके कुत्रे यांच्यामुळे होणारी अंड्यांची नासधूस यामुळे या कासवांचं अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळेच कासवांच्या संवर्धनासाठी असे वेगवेगळे प्रकल्प राज्यात व देशभरात राबिवण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या