अभिनेत्रीची सेटवरून थेट रूग्णालयात भर्ती

सामना ऑनलाईन, मुंबई

छोट्या पडद्यावर मोठं नाव कमावलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या काम्या पंजाबी हीला शूटींगच्या सेटवरून थेट कांदिवलीच्या गोकुळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगात ताप असतानाही ती शूटींग संपवण्याचा प्रयत्न करत होती. याचा परीणाम असा झाला की तिचा ताप वाढला आणि उलट्या व्हायला सुरूवात झाली. तिची प्रकृती आता स्थिर असून लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. रूग्णालयातून आपण थेट सेटवरच जाणार आहोत कारण मला शूटींग पूर्ण करायचं आहे असं काम्या पंजाबीने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या