Photo – रुबीना दिलैकचे पाण्यात ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते घायाळ

टिव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलैक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपले स्टायलिश फोटो, आगामी प्रोजेक्ट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.नुकतेच तिन इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. रूबिना काळ्या रंगाच्या थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.तिने यात केस मोकळे सोडले असून चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. फोटोशूट तिने पाण्यात केले आहे. तर गळ्यात सुंदर अशी चांदी आणि खड्यांची माळ घातली आहे.