टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किमती वाढल्या

39

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण आणि परदेशी वस्तूंवर वाढलेल्या कस्टम डय़ुटीचा फटका घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना बसला आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती दहा टक्क्यांनी वाढवल्या आहेत.  ऑक्टोबर महिन्यातच या किमतीत वाढ होणार होती; पण सणासुदीच्या काळ असल्याने ही वाढ पुढे ढकलण्यात आली.

फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्हीच्या किमती वाढणार आहेत. एलजी, सॅमसंग आणि सोनीने आपल्या वस्तूंवरील सामान्य विक्री किमतीवरील 10 टक्केपर्यंतच्या डिस्काऊंटसाठी दिली जाणारी सबसिडी मागे घेतली आहे. बॉश, सीमेन्स, हायर, शाओमी आणि बीपीएलही लवकरच किमतींमध्ये वाढ करणार आहे. सप्टेंबरमध्ये घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत वाढ होणार होती. दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या किमतीत कोणताही बदल केलेला नाही; पण आता या वस्तूंच्या किमती आहे तितक्याच ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मार्जिनवर खूपच परिणाम होत असल्याचे गोदरेज अप्लायंसेसचे बिझनेस हेड कमल नंदी यांनी सांगितले.

हायर इंडियाने त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत 9 टक्क्यांनी वाढ केली आहे. दिवाळीच्या काळात वेगवेगळय़ा ऑफर्स आणणाऱ्या विविध कंपन्यांनी आता वस्तूंच्या दरात वाढ केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या