टीव्ही मालिकेवरून नवरा-बायकोत तुफान हाणामारी

1753

टीव्ही मालिका पाहण्यावरून नवरा-बायकोत तुफान हाणामारी झाल्याची घटना पुण्यातील कात्रज येथे घडली. बायको आवडीची मालिका पाहत होती. पतीने रिमोट मागितला. पण तिने दुर्लक्ष केले. त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद झाला. वाद टोकाला पोहोचला आणि नवऱ्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने तिच्या हाताचा चावाही घेतला. त्यानंतर बायकोने थेट पोलिसांत नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. 30 वर्षीय बायकोने 39 वर्षीय नवऱ्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत असून शिवशंभो नगर येथे ही घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या