राशींवरून सासूबाईंचा स्वभाव ओळखा

प्रातिनिधीक फोटो

कोणत्याही उपवर मुलीच्या आयुष्यातील पतीव्यतिरिक्त महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सासू. आजच्या काळातील सासूबाई कालानुरूप विचारांनी, मनाने बऱ्यापैकी आधुनिक झाल्या असल्या तरी कोणत्याही मुलीच्या मनात धाकधूक असतेच की आपली सासू कशी असेल? मग येथे आम्ही तुमची मदत करणार आहोत. राशीवरून आपल्या सासूबाईंचा स्वभाव ओळखा.

मेष राशीची सासू

या राशाची सासू बाहेरून फणसासारखी काटेरी असली तरी आतून गोड असते. ती कठोर वाटली तरी प्रेमळ आहे. त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. रागावल्यानंतर त्या राग लगेच विसरूनही जातात.

वृषभ राशीची सासू

वृषभ या राशीच्या सासवा शांत स्वभावाच्या असतात, पण या सासूंना खूश करणे जरा कठीण असते. म्हणून वाद घालण्यापेक्षा कदाचित आज्ञाधारक राहूनच त्यांचे मन जिंका.

मिथुन राशीची सासू

या राशीच्या सासवा हसतमुख असतात. सुनेशी त्यांचे चांगले जमते. त्यामुळे सुनेशी जुळवून घेणारी मिथुन राशीची सासू असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात. सगळय़ा बाबतीत पाठिंबा देणारी सासू असते.

कर्क राशीची सासू

या राशीची सासू म्हणजे दुसरी आईच. प्रेमळ, समजून घेणारी आणि चुकले तर हक्काने दटावणारी अशी ही सासू. तिच्यासाठी तुम्ही त्यांची लेकच असल्याने सासूचे प्रेम तुम्हाला सतत मिळत राहील.

सिंह राशीची सासू

या राशीची सासू खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आपले मत सतत दुसऱ्यांवर लादण्याच्या त्यांच्या सवयीचा तुम्हाला वैताग येईल. पण त्या वेळी तिने केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा.

कन्या राशीची सासू

या राशीची सासू ही भावुक स्वभावाची असते. वेळ पडल्यास त्या कठोर होतील, पण त्याच्यामागे त्यांची काळजी असेल ते तुमच्या भल्यासाठीच आहे. हे लक्षात ठेवा.

तूळ राशीची सासू

या राशीची सासू ही प्रेमळ आहे. प्रत्येक कामात तुम्हाला त्या मदत करतील. त्यांच्या या निःस्वार्थी स्वभावाचा तुम्हालाही अनुभव येईल. त्यामुळे तुमचे एकमेकींशी चांगले पटेल.

वृश्चिक राशीची सासू

या राशीची सासू खंबीर आणि कणखर स्वभावाची असेल. त्यामुळे त्यांना वायफळ खर्च केलेला आवडत नसेल. त्यांचे अनुभवाचे बोल नक्की तुम्हाला कामी येतील.

धनु राशीची सासू

या राशीची सासू आशावादी असते. कठीण परिस्थितीतसुद्धा त्या अतिशय खंबीरपणे वागतात आणि तुम्हालाही बळ देतात. त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता
येतील.

मकर राशीची सासू

या राशीच्या सासवांना सर्व कामे अगदी नीटनेटके हवे असते. तुमच्याकडूनही त्यांची अशीच अपेक्षा असते. पण त्या तुमच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत.

कुंभ राशीची सासू

या राशीच्या सासूचा स्वभाव फार प्रेमळ असतो. प्रेमळ स्वभाव असल्यामुळे या पहिल्या भेटीतच तुमच्याबद्दल तर्क-वितर्क लढवत बसणार नाहीत. तिला बोलून दुखवू नका.

मीन राशीची सासू

या राशीची सासू गोड बोलून तुम्हाला कामांत गुंतवून ठेवेल. कुटुंबाबाबत खूपच दक्ष असणाऱ्या या सासवा वर्षानुवर्षे सांभाळलेला कुटुंबाचा ताबा स्वतःकडेच कायम ठेवणे पसंत करतात.

सासू म्हटली की कटकटी… सारखे उपदेश करणारी… पण काही सासवा याला अपवादही असतात. त्यांच्यासाठी त्यांची सून मुलगी असते. तरीही घर म्हटले की मतभेद होत असतातच. राशीभविष्यानुसार आपली सासू नेमकी कशी आहे… तिचा स्वभाव कसा आहे… हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकीला असते. राशींवरून सासू कशी असेल ते कळू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या