पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांसह 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा पोलीस दलातील 5 अधिकाऱ्यांना व 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये दररोज दोन हजारांपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सरकारी खात्यातसुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस दलामध्ये आतापर्यंत पाच अधिकाऱ्यांना व 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. मुख्यालयातील तसेच शहरातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तसेच कैदेत असलेल्या 110 कैद्यांना कोरोनाची लागण झालेली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ‘जे कैदी पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांच्याबाबत आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊ. सर्व कैद्यांना एकाच ठिकाणी कशा पद्धतीने ठेवता येईल याचा विचार सुरू आहे. लवकरच त्यासाठी आम्ही जागा निश्चित करून तेथे उपचार सुरू करणार’ , अशी माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या