शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कराड तालुक्यातील वीस हजार शिवसैनिक उपस्थित राहणार

शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसेना कराड उत्तर व दक्षिणमधील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित राहण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबतच्या नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वीस हजार शिवसैनिक या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. निष्ठावान शिवसैनिक दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहेत, अशी माहिती शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिली.

शिवसेना कराड तालुका दक्षिण व उत्तर कार्यकारिणीची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या अध्यक्षतेखाली कराड शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद पाटील, सुनील पाटील, तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, सतीश पाटील, महिला आघाडी संघटिका अनिताताई जाधव, युवा सेना जिल्हाधिकारी कुलदीप क्षीरसागर, यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पूर्ण वेळ देणार असून कराड उत्तर, दक्षिण, पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद प्रस्थापितांच्या उरात धडकी बसल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, सुनील पाटील, महिला आघाडी संघटिका अनिताताई जाधव, उत्तर तालुकाप्रमुख सतीश पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी कुलदीप शिरसागर यांनी आपले मनोगते व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार कराड तालुका प्रमुख शशिकांत हापसे यांनी मानले. बैठकीस शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड शहर प्रमुख शशी राज करपे, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, उपशहर प्रमुख शेखर बर्गे, अक्षय गवळी, उपतालुकाप्रमुख दिलीप यादव, संजय चव्हाण, ऋषिकेश महाडिक, शहाजीराव जाधव, विभाग प्रमुख अनिल चाळके, प्रवीण लोहार, किरण चौरे, सौरभ कुलकर्णी, महेश भावके, महेश कोळी, बापू भिसे, अण्णा रेंदाळकर, संभाजी जगताप, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कविता यादव, महिला आघाडी पदाधिकारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.