कोरोनाच्या भितीने गरोदर महिलेला तीन रुग्णालयांचा ऍडमिट करून घेण्यास नकार, जुळ्या मुलांचा मृत्यू

pregnant-women

केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भितीने गरोदर महिलेला तीन रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने जुळ्या मुलांचा आईच्या गर्भातच मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये 20 वर्षीय शहाला ही महिला गरोदर होती. तिला प्रसृती कळा सुरू झाल्याने मंजरी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. तिथे बेड नसल्या कारणाने रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर दोन रुग्णालयांनीही कोरोनाच्या भितीने तिला दाखल करून घेतले नाही. अखेर मंजिर रुग्णालयातच तिला दाखल करण्यात आले आणि तिची प्रसृती करण्यात आली परंतु पोटातच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला

शहाला आधी कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारानंतर 15 सप्टेंबर रोजी ती निगेटिव्ह झाल्याचे कळाले. 18 सप्टेंबर रोजी डिलिव्हरी साठी डॉक्टरांना संपर्क कराण्यात आला. जेव्हा मंजिली रुग्णालयात शहाला आणण्यात आले तेव्हा रुग्णालयाने निगेटिव्ह रिपोर्ट मानण्यास नकार दिला आणि दुसरी टेस्ट करण्यास सांगितले. पण शहालाकडे तितका वेळ नव्हता. रुग्णालयाने याबाबत अक्षम्य हलगर्जीपणा केल्याच आरोप महिलेच्या पतीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या