ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर दाखवला ‘माल’

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिची इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘अपना माल’ दाखवला आहे. हा फोटो अक्षय कुमार याचा असून सुट्टीत फिरायला गेलेले असताना हा फोटो काढण्यात आला होता. यामध्ये अक्षयची दाढी आणि डोक्यावरचे केस पांढरे असल्याचं दिसत आहे. ट्विंकलने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की ‘अपना माल हा लाकडी पिंपातील जुन्या दारूप्रमाणे (मस्त) झालाय, तुम्ही याच्याशी सहमत आहात?’

एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका करायला आवडेल!

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा पत्रकार परिषदेला सामोरा गेला होता. यावेळी त्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्याने सूर्यवंशी चित्रपटावेळचे अनुभव, ओटीटीचा वाढता प्रभाव आणि एकंदरच कोरोनानंतर बदललेलं अर्थकारण यांबाबत त्याने सविस्तर उत्तरं दिली.

कोरोनानंतर बॉलिवूडमध्ये बदललेल्या अर्थकारणाबाबतही त्याने सविस्तर सांगितलं. ओटीटीमुळे लोकांची आवड समृद्ध झाली आहे. आशय, मांडणी, निर्मिती आणि त्या कलाकृतीचं तिकीटबारीवरचं यश यांची सांगड घालणारं निश्चित असं काही समीकरण नसल्याचंही तो यावेळी म्हणाला. ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे यावर्षी एप्रिल-मे दरम्यान डीजिटल माध्यमावरही एका वेबसीरीजमधून पदार्पण करत असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकारांना दिली.

अक्षयच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी, निवडलेल्या भूमिकांविषयी त्याला प्रश्न विचारण्यात आले. पोलिसाच्या भूमिकेनंतर आता एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार का, या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं. एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची ऑफर करण्यात आली, तर ती देखील मला साकारायला आवडेल असं अक्षय यावेळी म्हणाला