माध्यमांना ट्विटरवरही करता येणार थेट प्रक्षेपण

37
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
तंत्रज्ञानाच्या युगात थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रिमिंग) करण्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फेसबूक, इन्स्टाग्राम यावर युजर्सला लाईव्ह स्ट्रिमिंग करता येतं. माध्यमंही फेसबूक लाईव्हचा वापर करत असताता. आता ही सुविधा लवकरच ट्विटरवरही सुरू होणार आहे. यासाठी ट्विटर लाईव्ह व्हिडिओ एपीआय आणणार आहे.
लाईव्ह एपीआयमुळे कंपन्यांना आणि माध्यमांना चागल्या दर्जाचे थेट प्रक्षेपण करता येणे शक्य होणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंगमच्या वेळेस ट्विटरवर जाहिरातीही टाकता येणार असल्यानं याचा ट्विटरला आर्थिक फायदाही होणार आहे.
फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंगला युझर्सकडून पसंती मिळत असल्याचं पाहून ट्विटरनंही लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय उपलब्ध करुण घेतल्याचा निर्णय घेतला आहे.व्यावसायिक माध्यमांना सोशल मीडियाशी कनेक्‍ट करण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार असून हे फेसबुक लाईव्हप्रमाणेच काम करेल. ट्विटरनं यासाठी ईएसएल आणि ड्रीमहॅक या प्रोग्रामिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. या कंपन्यांच्या मदतीनेच हे नवीन फिचर ट्विटर आणणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या