जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशाने २ हवाई सुंदरींना छेडले

22

सामना ऑनलाईन । नागपूर

स्वस्तात विमान प्रवासाची संधी मिळवून देणाऱ्या जेट एअरवेजच्या मुंबई-नागपूर विमानात २३ वर्षांच्या हार्डवेअर इंजिनिअरने दारूच्या नशेत दोन हवाई सुंदरींची छेड काढली. या प्रकरणी संबंधित हवाई सुंदरींनी सीट क्रमांक ४१ ई वर बसलेल्या आकाश गुप्ता या प्रवाशाविरोधात वैमानिक कॅप्टन गोपालसिंह मोहनसिंह यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कॅप्टन गोपालसिंह यांनी तक्रारीची प्रत आणि आरोपी आकाश गुप्ता याला सीआयएसएफच्या (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ताब्यात दिले आहे.

आकाश गुप्ता हा मूळचा मध्य प्रदेशमधील बालाघाट येथील रहिवासी आहे; त्याच्याविरोधात सीआयएसएफने दिलेल्या माहिती आधारे सोनेगांव पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती आकाशला न्यायालयात सादर केले. न्यायालयाने आकाशला न्यायालयीन कैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

गोव्याहून मुंबईला आलेला आकाश विमानात बसला त्यावेळी दारूच्या नशेत होता. त्याने प्रवासादरम्यान दोन हवाई सुंदरींचा हात धरला. इतर प्रवाशांच्या मदतीने हवाई सुंदरींनी स्वतःची सुटका करुन घेतली आणि घडलेल्या घटनेची माहिती वैमानिकाला दिली.

आपली प्रतिक्रिया द्या