मालवणात २ अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध, १२ जागांसाठी ९६ उमेदवार रिगणात

16

सामना ऑनलाईन । मालवण 

मालवण तालुक्यात जिल्हापरिषद ६ जागांसाठी ३४ तर पंचायत समिती १२ जागांसाठी ६४ असे एकुण ९८ अर्ज दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रीयेत दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले. कोणाही उमेदवाराने अन्य उमेदवाराविरोधात कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. १३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी उपेंद्र तांबोरे यांच्या उपस्थितित तहसील कार्यालय मालवण येथे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवार व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. आचरा जिल्हापरिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार जुबेर काजी हे २०१२ साली आचारा पंचायत समितीतुन निवडणुक रिंगणात होते. त्यावेळी त्यांनी निवडणुक खर्चाचा तपशील निवडणुक विभागास सादर न केल्यामुळे त्यांना ऑगस्ट २०१२ साली ५ वर्षासाठी निवडणुक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले होते. ती पाच वर्षाची मुदत पुर्ण न झाल्याने काझी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अपात्र ठरवला. तर सुकळवाड पंचायत समिती मतदार संघ अनुसूचित जाती साठी आरक्षित आहे. या जागेसाठी शशांक पवार यांने अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र जातपडताळणी प्रमाणपत्र अथवा पावती शशांक यांनी सादर न केल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

दोन अर्ज अवैध ठरल्यामुळे जिल्हापरिषद ६ जागांसाठी ३३ तर पंचायत समिती १२ जागांसाठी ६३ असे एकुण ९६उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. यात कॉंग्रेस, शिवसेना व भाजपा यांचे प्रत्येकी १८ असे एकूण ५४, राष्ट्रवादी ३ तर अपक्ष व बंडखोर यांची संख्या ३९ आहे. अर्ज मागे घेण्याच्या १३ तारीख पर्यंत बंडखोरी शामावण्यात सर्व पक्षांना यश येते का ? याची उत्सुकता लागुन राहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या