
महागड्या चारचाकी गाड्या चोरणाऱ्या उच्चशिक्षितासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 21 लाखांची अलिशान गाडी जप्त केली आहे. पुण्यातील विविध भागांतून 15 अलिशान मोटारी चोरण्याच्या त्यांचा डाव उघडकीस आला आहे. यासाठी दत्तवाडी पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्हीतील तब्बल 50 ते 60 हजार वाहनांचे फुटेज शोधून आरोपींचा माग काढला.
अनिलकुमार (रा. बेंग्लोर, कर्नाटक) आणि गोपीनाथ जी (रा. चेन्नई राज्य तामिळनाडू ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरेंद्र अनंत वीर (रा. पर्वती) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पर्वतीतून सुरेंद्र यांची अलिशान गाडी चोरट्यांना चोरून नेली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला. 200 ते 250 अस्पष्ट ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्याशिवाय शिवापूर आणि आणेवाडी टोलनाक्यावर सुमारे 60 ते 70 हजार वाहनांचे फुटेज तपासले असता, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला आणि प्रमोद भोसले यांनी टोलनाक्यावरील कॉमन फास्टटॅग शोधून काढून सापळा रचून दोघांना अटक केली. ही कामगिरी अपर आयुक्त राजेंद्र डाहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक, विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, नवनाथ भोसले, किशोर वळे, अमित चिव्हे, अमोल दबडे यांनी केली.
चोरीचा डाव उधळला
आरोपी हे उच्चशिक्षित असून गाडीच्या तांत्रिकतेची त्यांना माहिती आहे. मुख्य सुत्रधार अनिलकुमार असून डिजीटल चावी बनविणारे क्लोन डिव्हाईस ( मशिन) व प्रोग्रॅमिंग करुन तो गाड्या चोरत होता. त्यांनी पुण्यात यापुवा येवुन रेकी करून 15 इन्होव्हा क्रिस्टा, इटिव्हॉस, फॉरच्युनर गाड्यांचे नंबर मिळवून चोरीचा डाव रचला होता, मात्र दत्तवाडी पोलीसांच्या सर्तकतेमुळे दोघांना अटक करण्यात आली.