दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

हिंदुस्थान सरकारने सध्या स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून शस्त्रास्त्रनिर्मितीचे धोरण अवलंबिले आहे. ओदिशामधील चांदीपूर येथील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रावरून पृथ्वी 2 आणि अग्नि 2 या दोन कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या लागोपाठ चाचण्या घेतल्या. संरक्षण मंत्रालयाने दोन्ही प्रणालींच्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली.