पुणे तिथे एकमेकांना ‘धुणे’… party with differences

60

सामना ऑनलाईन,पुणे

पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपच्या वतीने गणेश घोष यांचे नाव सुरुवातीला जाहीर करून ते ऐनवेळी कापण्यात आले. त्यांच्या जागी गणेश बिडकर यांचे नाव घुसविले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत राडा घातला. पालिकेतील सत्ताधारी भाजपचे कार्यालय, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची अक्षरशः तोडफोड केली. त्यामुळे पारदर्शक काचा फुटल्या. स्वीकृत नगरसेवकपदासाठी कार्यकर्त्यांचे रक्त सांडले. शिस्तप्रिय पक्ष आणि नैतिकतेचा टेंभा मिरविणाऱया भाजपचा या घटनेने बुरखा फाटला.

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज अर्ज भरण्याची मुदत होती. स्कीकृत नगरसेककांची संख्या पाच आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे तीन, राष्ट्रकादीचा एक, तर शिकसेना आणि काँग्रेसपैकी एक जण चिठ्ठीवर जाणार आहे. या पदासाठी भाजपकडून सुरुवातीला गोपाळ चिंतल, रघू गौडा आणि गणेश घोष यांच्या नावासाठी पालक मंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून संमती देण्यात आली होती. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना ही नावे कळविण्यात आली होती. मात्र दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भिमाले यांना फोन केला. गणेश बिडकर यांचा या पदासाठी अर्ज भरा, असे सांगितले. त्यानंतर बिडकर हे अर्ज भरण्यासाठी पालिकेत आले. सभागृह नेते यांच्या कार्यालयातील ऍण्टी चेंबरमध्ये चिंतल, बिडकर, गौडा आणि स्वतः भिमाले अर्ज भरत आणि चर्चा करत होते. त्या वेळी घोष हे भिमाले यांच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी आले. ‘तेव्हा तुझ्या नावाच्या जागी बिडकर यांचे नाव आले आहे’ असे भिमाले यांनी सांगितले. त्यावर घोष यांनी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना फोन केला. त्यांनाही बिडकरांचे नाव प्रदेशकडून आल्याचे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला नाव जाहीर करून ऐनवेळी गणेश घोष यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे घोष आणि बिडकर यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले.

गणेश घोष यांचे कार्यकर्ते कार्यालयात घुसले. त्यात बिडकर यांना मारहाण झाली. त्यात बिडकरांचा शर्ट फाटला. गौडा आणि भिमाले यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर घोष यांच्यासह त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सभागृह नेते भिमाले यांच्या कार्यालयाची अक्षरशः तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यालयातील फायली, कागदपत्रे तिसऱया मजल्यावरून खाली फेकली. भिमाले यांचे ऍण्टी चेंबर, भाजपच्या कार्यालयात काचांचा अक्षरशः खच पडला होता. या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरसमोर सर्व खुर्च्या आणि काचांचा खच पडला होता. त्यामुळे पारदर्शक काचांना तडे गेले. पालिकेतील तिसऱया मजल्यावरील सर्व कुंडय़ा फोडण्यात आल्या. या दहशतीमुळे भाजपचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते, पालिकेचे कर्मचारी, शिपाई भीतीपोटी पालिकेतील अन्य कार्यालयांत  जाऊन बसले. भाजपचे कार्यकर्त दिसेल ते फोडत होते. गणेश घोष हे स्वतः दोन्ही हातांनी बेभान होऊन काचा फोडत होते. त्यात ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्या हातांना मोठी जखम झाली. ते मोठमोठय़ाने ओरडत होते. अखेर काही कार्यकर्त्यांनी त्यांना धरून तिसऱया मजल्यावरून खाली नेले. सुमारे अर्धा तास हा धुडगूस सुरू होता. त्यानंतर महापौरांची गाडी पार्ंकग करण्याच्या जागेजवळही  बराच वेळ गोंधळ सुरू होता. घोष यांना कार्यकर्त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुमारे तासाभरानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा महापालिकेत आला. त्यांनी सर्क कार्यकर्त्यांना पांगकले.

धुडगूस संपल्यानंतर पोलीस आले 

महापालिकेत हा सर्व धुडगूस संपल्यानंतर पोलीस पालिकेत आले. पोलिसांनी तिसऱया मजल्यावरील सर्क दालनांची पाहणी केली. झालेल्या घटनेसंदर्भात त्यांनी सभागृह नेते भिमाले आणि महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर तिसऱया  मजल्याकरील कोणालाही येऊ दिले नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हेते.

 आम्ही पक्षासाठी आंदोलने करायची आणि हे पैसे घेऊन बिडकरांना संधी देतात

भाजपने उमेदवारी दिलेल्यांना स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी देणार नाही असे जाहीर केले होते. पण गणेश बिडकर यांचा पराभव होऊनही त्यांना या पदासाठी संधी दिली. त्यावर ‘पैसे घेऊन बिडकर यांना संधी देण्यात आली आहे, आम्ही पक्षासाठी आंदोलने करायची, गुन्हे अंगाकर घेतले तरी पक्ष संधी देत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया घोष यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

अर्ज भरताना एकही पदाधिकारी नव्हता 

स्वीकृत नगरसेवकपदाचा गणेश बिडकर, रघू गौडा आणि गोपाळ चिंतल यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे अर्ज दाखल केला.  त्यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यापैकी एकही पदाधिकारी हजर नव्हता. त्यामुळे भाजपमधील गटबाजीचे पुन्हा एकदा दर्शन झाले.

काय घडले?

  • पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदांसाठी अर्ज भरण्याची मुदत होती. भाजपकडून तीन नावे सुचवली गेली.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून त्यातील गणेश घोष यांच्याऐवजी गणेश बिडकर यांचा अर्ज भरला गेला.
  • संतप्त घोष आणि बिडकर समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
  • सभागृह नेत्याच्या केबिनसह भाजपा कार्यालयाची तोडफोड.
  • बिडकर यांचे कपडे फाडून मारहाण.
  • फायली, कागदपत्रे फाडून तिसऱया मजल्यावरून खाली भिरकावली.
आपली प्रतिक्रिया द्या