कोल्हापूर: मुंबईच्या दोन तरुणांचा नदीन बुडून मृत्यू

45
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
मुंबईमधील दोन तरुणांचा कोल्हापुरच्या पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेश खोपकर आणि मयूर बनसोडे अशी या दोघांची नावे असून शीव-चुनाभट्टी परिसरातील ते रहिवासी आहेत.
कोल्हापूर येथील वडणगे गावातील आपल्या नातेवाईकांकडे हे दोन तरुण आले होते. गणेश आणि मयूर आज दुपारी गावाशेजारून वाहणाऱ्या नदीत पोहायला उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दोघांचेही मृत्यूदेह हाती लागले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आपली प्रतिक्रिया द्या