दाभोळ पॉवरच्या डोक्यावर थकबाकीचे भूत कायम

36

सामना ऑनलाईन । मुंबई

दाभोळ पॉवर कंपनीचे गॅस आणि पॉवर असे विभाजन झाले असले तरी त्या कंपनीच्या डोक्यावरील थकबाकीचे भूत अद्याप कायम आहे. दाभोळ कंपनीने 1990 ते 2001 या कालावधीत इंडियन ऑइलकडून नाफ्था खरेदी केला होता, तर एबीबी फायरकडून फायर फायटिंग सिस्टम खरेदी केली होती. त्याची थकबाकी दीड कोटी रुपयांच्या घरात गेली असून दोन्ही कंपन्यांनी वसुलीसाठी न्यायालयात धाव घेतल्याने आधीच अडचणीत असलेल्या दाभोळ पॉवरच्या अडचणी वाढल्या आहेत.

दाभोळ पॉवर कंपनीने वीजनिर्मितीसाठी अवश्यक असलेला नाफ्था इंडियन ऑइलकडून खरेदी केला होता. त्याच्या किमतीपैकी सुमारे 33 लाख रुपये थकबाकी होती, तसेच फायर फायटिंग सिस्टमचेही 37 लाख रुपये थकीत होते. कंपनी आर्थिक अडचणीत आल्याने गेल्या 15 वर्षांत या थकीत रकमेपैकी एक रुपयाही भरले गेलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही कंपनीची व्याजासह 1 कोटी 48 लाख रुपये थकबाकीचा आकडा झाला आहे. त्याच्या वसुलीसाठी दोन्ही कंपन्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून जूनमध्ये सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या