Chandrapur news – अस्वलासह आता दोन पिल्ले दिसली, चंद्रपुरात ग्रामस्थांमध्ये दहशत

bear-water-search-chandrapur

चंद्रपुरात वाघाची दहशत असताना आता शेतात आपल्या पिल्ल्यासह अस्वल दिसल्याने दहशतीत भर पडली आहे. चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गावातील शेतात हे अस्वल फिरत आहे. गावकऱ्यांनी माहिती देताच वनविभागाचे अधिकारी गावात पोहचले. वन विभागाकडून मध्यरात्रीपर्यंत गस्त सुरु आहे. फटाके फोडून अस्वलीला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.