खोपोलीतील कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगार ठार, शरीराचे झाले तुकडे-तुकडे

733

खोपोलीतील इंडिया स्टिल कारखान्यात सोमवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगार ठार एक जण गंभीर जखमी झाला आहे. कच्चेलोखंड गॅस कटरने कापून भट्टीत वितळवून टाकण्याची प्रकिया सुरू असताना गॅस टॅंकचा स्फोट झाल्याची माहिती कळते आहे.

या घटनेतील मृत कामगारांची नावे दिनेश वामनराव चव्हान (वय 55),प्रमोद दूधनाथ शर्मा (वय 30) अशी आहेत. तर जखमी कामगाराचे नाव सुभाष धोंडीबा वांजळे (वय 55) असे आहे.

दोघांचेही मृतदेह खोपोली नपा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले असून जखमी कामगाराला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटाची भीषणता एवढी होती की दोन्ही कामगारांच्या शरीराचे असंख्य तुकडे झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या