
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास पालघरमध्ये 15 मिनिटांच्या अंतरांनी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले होते. पहिला 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का 5 वाजून 15 मिनिटांनी जाणवला. तर, दुसरा 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का 13 मिनिटांच्या अंतरांनी म्हणजेच 5.28 मिनिटांनी नोंदवण्यात आला. मात्र या भूकपांच्या धक्कांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.