अंबाजोगाईमधील दोन तोंडाच्या बाळाचा मृत्यू

20

सामना ऑनलाईन, बीड

अंबाजोगाईमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन तोंडाचे बाळ जन्माला आले होते. या बाळाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी रात्री ८:३० वाजता जन्मलेल्या या बाळावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु  अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. असं बाळ जगण्याची शक्यता खूप कमी असते, मात्र डॉक्टरांनी त्याचा जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद न दिल्याने या बाळाचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाला वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती मात्र पालकांनी याला नकार दिल्याने डॉक्टरांनी या बाळाचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवला. या बाळाची देशभर चर्चा सुरु होती. सोशल नेटवर्कींग साईटवर देखील या बाळाबाबतची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात होती.

आपली प्रतिक्रिया द्या