संभाजीनगरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले

34

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. कन्नड, सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे नद्या, नाले तुंडूब भरून वाहत आहेत. भारंबा तांडा येथे या पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील एका वनरक्षकाचा मृतदेह सापडला असून राहुल दामोदर जाधव (वय 30,रा. सिंदखेडराजा) असे या वनरक्षकाचे नाव आहे.

तालुक्यातील पिशोर परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने अंजना नदीसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पुराच्या पाण्यात वनविभागाचे दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील राहुल दामोदर जाधव यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर अजय संतोष भोई (रा. शिरपुर जि. नंदुरबार) हे अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी वन अधिकारी, पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी त्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या