भारती विद्यापीठ, बिबवेवाडीत दरोड्याच्या तयारीतील दोन टोळ्यांना अटक

पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात आणि इंदिरानगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यांना पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून मिरची पावडर, कोयता, दांडके जप्त करण्यात आले आहे.

सौरभ शरद शिंदे , चंदर हुन्नापा राठोड ( दोघेही रा. इंदिरानगर) स्वप्नील सखाराम गिजे (रा. बिबवेवाडी), रोहन सतीश भालके (रा. आंबेगाव ) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. तर बिबवेवाडीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पैजान अश्पाक शेख (20, रा. कसबा पेठ), प्रमोद दत्तात्रय कदम (24, रा. बिबवेवाडी), मिलिंद अनिल अहिवळे (21, रा. इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस काल रात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्रिमूर्ती चौकात संशयास्पद बसलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दरोड्याच्या तयारीतील साहित्य आढळले. दुसऱ्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक बिबवेवाडीतील इंदिरानगरमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या