दोन फूल एक माळी, बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची भररस्त्यात तुफान हाणामारी

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चित्रपटामध्ये आपण एक फूल दोन माळी म्हणजे एक अभिनेत्री आणि तिच्यावर प्रेम करणारे दोन अभिनेते असा प्रकार पाहिला. परंतु, हिमाचल प्रदेशमध्ये उलटा प्रकार झाला आहे. येथे एक माळी आणि दोन फूल असा प्रकार घडला. एका मुलासाठी दोन तरुणी भररस्त्यामध्ये एकमेकांशी भिडल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दोन्ही तरुणी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. अक्षरश: रस्त्यावर बसून त्या एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशमधील हरीमपूर जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार येथील बडसर कॉलेजमध्ये घडला. व्हिडिओमधील एक तरुणी दुसऱ्या तरुणीला दम देत होती. ‘मी तुला सांगितलं होते की त्याला ब्लॉक कर, परंतु तू तसं नाही केले नाहीस’, असं म्हणत या दोघी एकमेकांच्या झिंज्या ओढत भांडत होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या