दानशूर बालवीर! पिग्गी बँकमधील बचत मुख्यमंत्री सहायता निधीला

432

कोरोनाच्या संकटाशी लढताना परिस्थिती हाताबाहेर गेल्याने काही राष्ट्रांनी हात टेकले आहेत. अनेक मोठ्या व्यक्ती मदत करत आहेत हे पाहून, या संकटाशी दोन हात करताना आपण ही मदत करावी हा निर्धार पालघर जिल्ह्यातील बच्चे कंपनीने केला आहे. पालघर जिल्ह्यातील कोळगाव या गावातील कशिष कमलेश संखे व मिष्टी कमलेश संखे (दोघे वय ५ वर्ष) यांनी “आमची हि छोटीशी मदत मुख्यमंत्र्यांना द्या” असे सांगत वडिलांकडे दिली. खारीचा वाटा देणाऱ्या चिमुकल्यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.

कमलेश संखे हे ग्रामविकास अधिकारी असून सध्या बोईसर येथे कार्यरत आहेत, त्यांची पत्नी स्नेहल संखे कोळगावच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. पाच वर्षाची जुळी मुले कशिष आणि मिष्टी यांनी घरात टीव्हीवर पाहून तसेच आपल्या आईवडिलांची कोरोना या आपत्ती नियंत्रणाबाबत चाललेली धडपड पाहून नातेवाईकांनी खाऊसाठी दिलेल्या रकमेतून साठवलेले पैसे चिमुकल्यांनी मदतीसाठी देण्याचे ठरवले. आपल्या देशाच्या या कठीण काळात आपणही या देशाचे काही तरी देणे लागतो हे नकळत पणे या चिमुरड्यांनी दाखवून दिले. त्यानुसार आज पिग्मीत जमा झालेले 7775 रुपये वडिलाना दिले, त्यांच्या वडिलांनी त्याचा धनादेश बनवून शासकीय प्रांताधिकारी विकास गजरे, तहसीलदार सुनिल शिंदे आणि गट विकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्याकडे सुपूर्द केला.

नातेवाईकांनी खाऊसाठी दिलेल्या पैशातुन बचतीची सवय लागावी या उदेशाने मुलांना पिग्गी बँक दिली होती. मुलांनी त्यांच्या वडिलांच्या हातात piggy bank आणून दिली. त्यांच्या या वागण्याने मला खूप आश्चर्य वाटले आणि अभिमान ही वाटला. “
स्नेहल संखे (मुलांची आई), ग्रामपंचायत सदस्या कोळगाव

आपली प्रतिक्रिया द्या