आंबा घाटातील खून प्रकरणी दोघांना अटक

43
murder

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

रत्नागिरी – कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटाच्या सुरुवातीला २० मार्च रोजी दरीकडच्या भागात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. हा घातपाताचा प्रकार असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यानुसार गेले १५ दिवस तपास करून देवरुख पोलिसांनी आज दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे दोनही संशयित  इचलकरंजीमधील असल्याचे सांगण्यात आले. ज्याचा तो मृतदेह होता त्याचे नाव प्रकाश हजारे (३३) असे होते. यामुळे या घातपाताची पाळेमुळे खोदून काढण्यास पोलिसांना यश येण्याची चिन्ह आहेत.

२० मार्च रोजी रत्नागिरी – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटाच्या सुरुवातीला काहितरी कुजल्याचा वास येत असल्याने ग्रामस्त तसेच प्रवाशांना संशय आला. काहींनी याची पाहणी केल्यावर गायमुखाच्या पुढे आंब्याच्या दिशेला असलेल्या मारुती मंदिर समोर एका तरुणाचा मृतदेह कुजल्याचे आढळून आले. देवरुख चे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि सहकारी संध्याकाळी उशिरा घटनास्थळी रवाना झाले. साखरपा पोलिसांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढला होता. यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्यावर पोलिसांनी हा खुनच असावा असा दाट संशय व्यक्त केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या