सीआयडीत असल्याचं सांगून वृद्धाला ८६ हजारांचा गंडा

46

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

सीआयडीमध्ये असल्याची बतावणी करत दोन अनोळखी व्यक्तींनी एका वृद्धाला ८६ हजारांचा गंडा घातला आहे. रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही अनोळखी व्यक्तींविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयवंत ज्ञानू चौघूले असं फसवणूक करण्यात आलेल्या वृद्धाचं नाव आहे. गाडी सर्व्हिसिंगला देऊन बाजारात खरेदीसाठी गेले असता दोन भामट्यांनी सीआयडी असल्याचं सांगत चौघुले यांना तुमच्याकडे ड्रग्स असल्यानं झडती घ्यायची असल्याचं म्हटलं. त्यांच्या सांगण्यानूसार चौघूले यांनी अंगठी, चैन आणि ब्रेसलेट अशा मौल्यवान वस्तू रुमालात बांधून दिल्या. मात्र गर्दीचा फायदा घेत दोघेही भामटे पसार झाले. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर चौघूले यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या