सावत्र बहिणीशी प्रेमप्रकरणावरून तरूणाच्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

सावत्र बहिणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणावरून एकाने वडिलांच्या मदतीने तरूणाच्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ल करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील दांडेकर पूल परिसरात घडली.

याप्रकरणी हर्षद गणेश जातेगावकर (वय 23), गणेश जातेगावकर (वय 55 रा. शुक्रवार पेठ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हातागळे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आकाश बापू मस्के यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री अकराच्या सुमारास समीर आणि आकाश त्यांच्या घरासमोर शेकोटी करून बसले होते. समीरचा भाऊ अमनचे एका मुलीशी प्रेम होते. त्याचा राग मुलीचा सावत्र भाऊ हर्षदला होते. त्याचा वचपा काढण्यासाठी बाप लेकांनी समीरवर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे समीर गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या