चांगल्या पावसासाठी त्या ‘दोघांनी’ केले लग्न

20

सामना ऑनलाईन | इंदूर

हिंदुस्थान कृषीप्रधान देश आहे आणि इथली शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी अनेक यज्ञ, पूजापाठ, नवस असे विविध प्रकार इथे केले जातात. मात्र मध्यप्रदेशमधील इंदूर येथे चांगला पाऊस व्हावा यासाठी चक्क दोन तरुणांनी एकमेकांशी लग्न केलं आहे. संपूर्ण हिंदू चालीरितीने हा विवाह सोहळ पार पडला.

आपल्या गावात चांगला पाऊस व्हावा यासाठी या तरुणांनी प्रतिकात्मक विवाह करुण वरुणदेवाला नवस केला आहे. राकेश व सखाराम असं ह्या दोन विवाहीत तरुणांची नाव आहेत. या दोन तरुणांनी लग्न केलं म्हणून या परिसरात चांगला पाऊस प़डेल याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. मात्र विवाहादरम्यान वरुणराजानं काही वेळ याठिकाणी हजेरी लावली होती त्यामुळे गावकरीही सुखावले. इंद्रदेवाला खूश करण्यासाठी या विवाह सोहळ्यांच आयोजन केल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या