एक धाव… कन्याकुमारी ते कश्मीर! नौदलाच्या अधिकाऱ्यांचा आरोग्य जनजागृती उपक्रम

कोरोना महामारीमुळे लोकांच्या मनात पसरलेली भीती दूर करण्यासाठी आणि आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी नौदलाचे दोन अधिकारी कन्याकुमारी ते कश्मीर धाकत आहेत. 56 दिवसांत 4431 किलोमीटर अंतर पार करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

राजस्थानचे रामरतन आणि हरयाणाचे संजय कुमार यांनी राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी रोजी कन्याकुमारी ते कश्मीर हे अंतर धावण्यास सुरुवात केली. 8 मार्च रोजी त्यांच्या उपक्रमाची सांगता कश्मीरमध्ये होणार आहे. सध्या ते निर्धारित वेळेआधी म्हणजे 53 दिवसांत कश्मीरच्या दल सरोवरापर्यंत पोचले आहेत.

सुमारे 4200 किलोमीटर अंतर त्यांनी धावून पार केलेय. या प्रवासात त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी इतर ठिकाणचे धावपटूही सहभागी होत आहेत. रामरतन आणि संजय कुमार यांचे कश्मीरात जोरदार स्वागत करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या