व्यापाऱ्याला फसवणाऱ्या परराज्यातील टोळीला अटक

590

नगर शहरातील व्यापार्‍यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला असून परराज्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीमध्ये काशिद रशिद शेख व रियाज रज्जाक लोहार यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना मध्य प्रदेशात नेण्यात आले असून पीढील तपास सुरू आहे.

20जुलै 2019 रोजी नगर शहरातील भुसार मालाचे थ्यापारी भगवानदास गुलयंद गांधी (वय 72) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीचा 230 क्विंटल सोयाबीनचा माल ट्रकचालक मुकेश कुमार (रा.सैंदवा,मध्य प्रदेश) यांना महाराष्ट्र आईल अँक्ट्रक्शन प्रा.लि.अयधान धुळे या कंपनीला पोहोचवण्यासाठी दिला होता. मात्र, ट्रकचालक मुकेश कुमार यांनी सोयाबीनचा माल हा दिलेल्या कंपनीला पोहच न करता स्वतःच्या घरी उतरवला. याबाबत तक्रारदारांनी दिलेल्या माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्याकडे देण्यात आला. तेव्हा कोतवाली पोलीसांनी सदर ट्रकचालक मुकेश कुमार यांचा सैदवा येथे जावुन शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्यानंतर ट्रकमालक बबलु उर्फ काशिद रशिद शेख याला सैंदवामधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ट्रकचालक मुकेश कुमार उर्फ संतोष कुमावत याच्याशी संगनमत करून गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. गुन्ह्यासाठी वापरलेल्या ट्रकबाबत विचारपुस केली असता काशिद शेख यांनी ट्रकमध्ये बदल करण्यासाठी ती गॅरेजमध्ये दिल्याचे सांगितले. हा ट्रक राज ट्रक बॉडी बिल्डर मेकॅनिक नगर सेंधवा येथील गॅरिजमधून जप्त करण्यात आला.

आरोपी काशिद रशिद शेख व रियाज रज्जाक लोहार यांना अटक करुन न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना मध्य प्रदेशमध्ये पुढील तपासासाठी नेण्यात आले आहे. रियाज लाहोर यांचेमार्फत रोख यांना पैसे घेवुन मनोज रमेशचंद यांचे गोडाऊनमध्ये ठेवलेला 6 टन 680 किलो माल हा जप्त केला आहे. त्यानंतर ट्रकमालक काशिद शेख यांनी ओम ट्रेडर्सचे मालक दिलीप राठोड यांना सचिन बडवाणी यांच्यामार्फत विकलेला 8 टन 390 किलोचा सोयाबीन माल जप्त केला.एकुण 15 टन सोयाबीन जप्त केले असून गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे. ही पोलीस अधीक्षक ईशु सिंधु, अपर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्यासह पोलीस नाईक आण्णा बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शेळके, राजु शेख यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या