बलात्कार प्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना अटक 

सामना ऑनलाईन । पुणे
रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेवर अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर रिक्षाचालकाने बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन बलात्कार केला. चार दिवस तिला घरामध्येच कोंडून ठेवले. त्यानंतर मित्रालाही तिच्यावर अत्याचार करण्यास लावल्याची घृणास्पद घटना वारजे येथे उघडकीस आली आहे. या पिडीत महिलेने तक्रार केल्यानंतर पोलीसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे.
एका ३३ वर्षीय महिलेने (रा. कोल्हापूर) यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही पिडीत महिला कोल्हापूरची असून, तिचा पती पुण्यात व्यवसाय करतो. त्या दोघांमध्ये घटस्फोटासंदर्भात न्यायालयात केस सुरू आहे. त्या कामानिमित्त ती २४ फेब्रुवारी रोजी रात्री पुण्यात आली. कर्वेनगर भागात जाण्यासाठी तिने रिक्षा केली. त्यावेळी जाधव याने महिलेची विचारपूस केल्यानंतर तिने सर्व माहिती दिली. ती पुण्यातली नसल्याचे कळाल्यानंतर त्याने कर्वेनगरवरून ऑटो रिक्षा थेट गोकुळनगर येथील अंधारातल्या कच्च्या रस्त्याने नेली. तेथेच तिच्यावर बलात्कार केला. तिला ठार मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन टेरेसवर पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले तर खून करेन, असे तिला पुन्हा धमकावले.
दरम्यान, चार दिवस तिला त्याच्या घरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. झालेला प्रकार विसरून जा. माझ्या मित्राला त्याची बायको सोडून गेली आहे, त्याच्यासोबत तुझे लग्न लावून देतो, असे त्याने सांगितले. काही दिवसांनी तिला धोत्रेच्या घरी घेऊन गेला. धोत्रेनेही लग्नाची तयारी दर्शवत तिच्यावर २ मार्च ते ६ मार्च या कालावधीत बलात्कार केला. याप्रकरणी तिने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्वरीत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. याप्रकरणी दिलीप आण्णा जाधव (वय ३३, रा. गोकुळनगर वारजे), संतोष शामराव धोत्रे (वय ३०, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) या दोघाजणांना पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक  प्रियंका गायकवाड करत आहेत.