अल्टोच्या धडकेत दोन पोलिसांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

प्रातिनिधिक फोटो

नागपूर -जबलपूर मार्गावर शिवणीकडून सवारी भरून येत असलेल्या बोलेरो गाडीने मरारवाडी फाटय़ावर पवनीकडून नागपूरला जाणाऱया अल्टो 800ला जोरदारपणे धडक दिली. ज्यात एक पोलीस कर्मचारी रितेश देवराव भोरते जागीच ठार झाला आणि तीन जणांना गंभीर अवस्थेत नागपूरला पाठवण्यात आले.

खुमारी ते चोरबहुलीच्या दरम्यानच्या भागात नेहमी वाहतूक पोलीस डय़ुटीवर या भागात असतो. सकाळी 10 वाजताच्या सुमारास शिवणीकडून येत असणाऱया बोलेरो M.P-20-T-9124 ने पथरईवरून नागपूरला जात असलेल्या पी.गजेंद्र (65) क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर ऑडिनन्स फॅक्टरी यांना मरारवाडी फाटय़ावर जोरदार धडक मारली. त्यामुळे अल्टो गाडीचा ताबा सुटून डिव्हायडरवर बसून नाश्ता करणाऱयाच्या अंगावरून पलटी मारून गेली. ज्यात सेवारत पोलीस कर्मचारी रितेश भोरते (32 मु.दिधोरी नागपूर) जागीच मृत्यू झाला आणि त्याच्या सोबतीला बसलेला पप्पू पाली (मु.खुमारी) हाही गंभीरपणे जखमी झाला. अल्टो 800 मध्ये बसलेल्या छाया पी.गजेंद्र आणि मेहुणी ज्योती जैस्वाल (मु.यवतमाळ) हे दोघेही गंभीरपणे या अपघातात जखमी झाले. जखमींना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या