कात्रज जवळ कार 150 फूट दरीत कोसळली, सुदैवाने जीवीतहानी टळली

सामना ऑनलाईन । पुणे 

पुण्यातल्या कात्रज येथील दरीपूल येथे एक कार दरीत कोळसली. ही कार रस्त्याच्य्या खाली जवळपास दीडशे फुट खाली कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणूनच कारमधील दोघेजण बचावले आहेत. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांनाही सुखरूप बाहेर काढले असूत त्यांना जवळच्या रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. तर दरीत कोसळलेल्या कारला बाहेर काढण्याच काम सुरू आहे. अपघातात कारचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.