दुर्देवी घटना ! शेततळ्यामध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

sunk_drawn

शेततळ्यामध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सायंकाळी केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले. या घटनेने लाडेवडगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे मंगळवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली. शेततळ्यामध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला. यात हर्षद माधव लाड (10) आणि उमेद माधव लाड (7) अशी यांची नावे आहेत. हर्षद आणि उमेद दोघं शेतामध्ये गेले होते. त्यावेळी शेतातील तळ्यामध्ये बुडून य दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी शेततळ्याभोवती मोठी गर्दी केली.

आपली प्रतिक्रिया द्या