जम्मू-कश्मीरच्या बाटलिक भागात हिमस्खलन, दोन जवानांचा मृत्यू

23

सामना ऑनलाईन । जम्मू

गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये विशेषत: कश्मीर खोऱ्यात तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळेच बाटलिक भागात हिमस्खलन झाले, ज्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जवांनाना वाचवण्याच लष्कराला यश आलं आहे.

कश्मीरमध्ये तुफान बर्षवृष्टी सुरू असतानाही हिंदुस्थानचे जवान देशाच्या सीमांचे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी उभे आहेत. गुरुवारी बर्षवृष्टीचा जोर वाढला, जम्मू-कश्मीरमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अशातच गुरुवारी रात्री बाटलिक भागात हिमस्खलन झाले. यामध्ये काही जवान अडकले. त्यांना वाचवण्य़ाचे काम आज पहाटेपर्यंत सुरू होते. यामध्ये काही जवानांना वाचवण्यात यश आलं असलं तरी दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कश्मीर खोऱ्यात शाळा-महाविद्यालयांना १० एप्रिलपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत आहे. रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळत आहे. नागरीवस्त्यांमध्ये पाणी शिरलं असून जवान नागरिकांचा बचाव करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या