वर्गात ओरडल्याने ११ वीतल्या विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला

46

सामना ऑनलाईन, पुणे

केस कापण्यास सांगणाऱ्या आणि भरवर्गात खरडपट्टी काढणाऱ्या शिक्षकावर महाविद्यालयाच्या आवारातच एका विद्यार्थ्याने कोयत्याने खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. वाडेबोल्हाई भागातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर विद्यार्थी पसार झाला.

दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे अशी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सुनील पोपट भोर या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील भोर हा महाविद्यालयात बेशिस्तपणे वागत असल्याची माहिती समोर आली आहे. केस वाढवल्यामुळे दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे या शिक्षकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर त्यांनी भर वर्गातही सुनीलची खरडपट्टी काढली. त्या रागातून सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सुनीलने अचानक त्याच्याजवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने चौधरी आणि आबनावे यांच्यावर वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या