पुलवामात मोठी चकमक, हिजबुलचा टॉपचा कमांडरचा रियाझ नायकूचा खात्मा

1067

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनच्या टॉपचा कमांडर रियाझ नायकू याच्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीपासून या भागात चकमक सुरू आहे. चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर दगडफेक केली. रियाझ नायकूचा खात्मा हा सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

Jammu and Kashmir: Hizbul Commander Riyaz Naikoo has been eliminated by security forces in an encounter. pic.twitter.com/ewPE5ux7Ae

अवंतीपोरा येथील बैघपोरा या नायकूच्या मूळ गावातील एका बंगल्यात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री जम्मू कश्मीर पोलीस, हिंदुस्थानी लष्कर व सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रितपणे शोधमोहिम सुरू केली. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीला सुरुवात झाल्यानंतर कश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली.

रविवारी जम्मू- कश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकीत हिंदुस्थानचे चार जवान आणि एक पोलीस अधिकारी असे पाच जण शहीद झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या