कश्मीरात हिजबूलच्या २ दहशतवाद्यांना जीवंत पकडले

PC-ANI

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील हंडवारा जिल्ह्यात हिजबूल मुजाहीद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सीआरपीएफ आणि पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिनेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांची नावे सैन्यदलाने जाहीर केलेली नाही.

सोमवारी कश्मीरमधील हंडवारा भागात पोलीस आणि सैन्यदलाच्या जवानांनी ही शोध मोहिम राबवली. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एनआयए या वृत्त संस्थेने दिली आहे. दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी हे दोघे येथे दाखल झाले होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.