गतिमंद मुलांच्या वसतिगृहांना विद्यार्थ्यामागे दोन हजार अनुदान

36

सामना ऑनलाईन । नागपूर

राज्यातील मतिमंद मुलांच्या वसतिगृहांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता दिल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. वसतिगृहात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये दराने पालनपोषणासाठी अनुदान देण्यात येईल असे बडोले यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गतिमंद मुलांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या अनुदानाची रक्कम वाढविण्याबाबत विधानसभा सदस्य हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, किसन कथोरे, संदीप नाईक आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

त्याला सामाजिक न्यायमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. महिला व बालविकास विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित झालेल्या अनुदानित गतिमंद बालगृहे आणि संलग्न शाळा अशा १४ संस्थांमधील विद्यार्थ्यांना पालनपोषणासाठी अनुदान देण्याबाबत समिती गठीत करण्यात आली असून याबाबतचा निर्णय होईपर्यंत दर महिन्याला एका विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात येईल असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या