मोरवंडे शाळेजवळ दुचाकीला डंपरची धडक; दुचाकीस्वार जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे शाळा येथे भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, विजय कृष्णा मोहिते (48) असे दुचाकीस्वाराचे नाव असून तो चिपळूण तालुक्यातील लालसर मुंडे येथील रहिवासी आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा अपघात पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने अनर्थ टळला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे राहणारे खेतले हे आपल्या दुचाकीवरून चिपळूण येथून खेडकडे येत होते. त्याची दुचाकी मोरवंडे शाळेसमोर आली असता समोरून आलेल्या डंपरने डिव्हायडर जवळ दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार खेतले हे जखमी झाले.

अपघाताची खबर मिळताच येथील मदत ग्रुप खेड व हायवे मृत्युंजय दुतचे प्रसाद गांधी, रोहन इनरकार आणि अतुल जोशी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेले खेतले यांना रुग्णवाहिकेतून चिपळूण येथील विठाई रुग्णालयात दाखल केले. सध्या खेतले यांच्यावर विठाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या