एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. विरार पोलिसांनी ही कारवाई केली असून यासाठी अमेरिकेतल्या स्नॅपचॅट कंपनीची पोलिसांनी मदत घेतली होती. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना बेड्या घातल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी पीडितेच्या वडिलांना काही मित्रांनी एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगितले. हा व्हिडीओ आपल्या मुलीचा असल्याचे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हा व्हिडीओ स्नॅपचॅटवरचा असल्याचा पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी सायबर पोलिसांना पत्र लिहून आरोपीची ओळख पटवायला सांगितली. सायबर पोलिसांनी अमेरिकेतील स्नॅपचॅट कंपनीशी संपर्क साधून माहिती मागवली. स्नॅपचॅट कंपनीने माहिती दिल्यानंतर आरोपी नालासोपाऱ्याचा रहिवासी असल्याचे कळाले.
पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांनी 19 वर्षीय इयान दिमोंती या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. तेव्हा इयानने या प्रकरणात अँड्रिक ऑस्कर या तरुणाचे नाव घेतले. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असून कॉमर्स शाखेचे विद्यार्थी असल्याचे समजले.
पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली तेव्हा लक्षात आले की दिमोंती आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते. दिमोंतीने अल्पयवीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर दिमोंतीने मुलीला आपला नग्न व्हिडीओ पाठवयला सांगितला. तेव्हा मुलीने स्नॅपचॅटवरून हा व्हिडीओ पाठवला. पण मुलीने हा व्हिडीओ वन्स व्ह्यु म्हणजेच एकदाच पाहता येईल अशा फीचरने पाठवला. अशात जर समोरच्या युजरने हा व्हिडीओ स्क्रीन रेकॉर्डिंगच्या साहाय्याने रेकॉर्ड केला तर पाठवणाऱ्या युजरला तशी नोटिफिकेशन जाते. म्हणून आरोपी दिमोंतीने दुसऱ्या मोबाईलवरून हा व्हिडीओ शूट केला आणि व्हॉट्सॅपवर व्हायरल केला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीने असे आणखी कुणाचे व्हिडीओ व्हायरल केले आहेत का? आताच्या पिडीतेचा व्हिडीओ कुणाला पैसे देऊन विकले आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.