इंग्लंड: मंत्रीमहोदयांना पॉर्न बघणे पडले महाग

सामना ऑनलाईन । लंडन

ख्रिसमसला काही दिवसच उरलेले असताना इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचे फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट डॅमियन ग्रीन यांनी २००८ मध्ये कार्यालयातील संगणकावर पॉर्न व्हिडिओ बघितला होता. त्यांचे हे कृत्य म्हणजे मंत्र्यांसाठी असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

२००८ साली हाऊस ऑफ कॉमन्सच्या कार्यालयातील संगणकावर पॉर्न व्हिडिओ बघण्याबरोबरच २०१५ मध्ये पत्रकार केट मेल्टबी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप ग्रीन यांच्यावर होता. मात्र संसदीय समितीच्या चौकशीत त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते. पण नंतर संसदीय समितीच्या चौकशीत त्यांच्यावरील सर्व आरोप सिध्द झाले आहेत. त्यानंतर ग्रीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यात त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले असून संसदीय समितीच्या चौकशीत चुकीची माहिती देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या