पूरग्रस्त केरळला 700 कोटी देण्याची घोषणा नाही, यूएईच्या राजदूताचा खुलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुराच्या भयंकर संकटाचा मुकाबला करणाऱया केरळला मदत करण्यावरून आता वादाचा महापूर आला आहे. संयुक्त अरब आमिरातीने (यूएई) केरळला मदत म्हणून देऊ केलेले 700 कोटी रुपये केंद्रातील मोदी सरकारने विनम्रपणे नाकारले, तर सौदी अरबच्या राजदूताने 700 कोटी रुपये देण्याची कोणतीही घोषणा आम्ही केलेली नाही असा खुलासा केला. दरम्यान, पाकिस्तानात नव्याने आलेल्या इम्रान खान सरकारलाही केरळला मानवीय हेतूने मदत करण्याचा पुळका आला आहे.

केरळात महापुराने आतापर्यंत शेकडो बळी घेतले असून 10 लाखांपेक्षा जास्त मदत छावण्यांमध्ये आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देश-विदेशातून मदतीचा ओघ चालू आहे. दरम्यान, यूएईने केरळला 700 कोटी रुपयांची मदत देऊ केल्याचे जाहीर झाले, मात्र केंद्र सरकारने ही मदत घेण्यास केरळ सरकारला मनाई केली. संकटाचा मुकाबला स्वदेशी मदतीवरच केला जाईल असे सांगण्यात आले तर दुसरीकडे यूएई हिंदुस्थानातील राजदूत अहमद अलबन्ना यांनी आम्ही अशी मदत जाहीरच केली नाही असा पवित्रा आज घेतला.

summary- UAE denied news of donation for kerala